राज्यातल्या नेत्यांना दुय्यम भूमिका देऊन आपण कर्नाटकात सत्ता राखू शकणार नाही, याची भाजपची जाहीर कबुली...
दक्षिण दिग्विजयाच्या दृष्टीने भाजपसाठी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे महत्त्व मोठे आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर आपण लोकसभा जिंकतो, विधानसभा जिंकतो, महानगरपालिकाही जिंकतो, असा दावा करणाऱ्या भाजपची सारी मदार कर्नाटकमध्ये वयोवृद्ध पण बेरकी राजकारणी बी. एस. येदीयुरप्पा यांच्यावरच आहे. त्यांना खूष ठेवूनच आपण सत्ता राखू शकू, हे समजल्यानंतर येदीयुरप्पांवर स्तुतिसुमनांचा वर्षाव चालू केला आहे.......